चांगल्या स्वभावामुळे नातं टिकवता येते. | Good nature can save a relationship

चांगल्या स्वभावामुळे नातं टिकवता येते.

good-nature-can-save-relationship

कोणतीही गोष्ट न चिडता रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपा आहे. पण त्याला न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते, प्रकाश आला की अंधार निघून जातो तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलाच पाहिजे तेव्हाच तर कळतं कोण हसताय, कोण दुर्लक्ष करते आणि कोण सावरायला येते. कधी कधी शांतच राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळालं तर त्याला नशीब म्हणतात. सर्व काही असूनही रडवत त्याला दुर्दैव म्हणतात. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतो त्याला आयुष्य म्हणतात.

माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो, माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो, कारण तो आपला स्वभाव कधीच बदलत नाही.

जगदीश वडोदे

(मो. +917721012202)

Post a Comment

0 Comments