शिधा पत्रिका - आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरकारचा मुदत वाढीचा निर्णय | Aadhar card - Ration card Linking Dateline

शिधा पत्रिका - आधार  कार्ड लिंक करण्यासाठी सरकारचा मुदत वाढीचा निर्णय  / Aadhar card - Ration card Linking Dateline -

 सर्वसामान्य लोकांसाठी सरकारने आधार कार्ड -रेशन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे.  पूर्वी आधार - रेशन कार्ड लिंक  करण्याची  शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ निश्चित केली  होती . परंतु आता सरकारने दोन्ही कार्ड लिंक करण्याची तारीख ३० जून २०२३ पर्यंत केली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे तुम्ही आता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता. या संदर्भात अधिक माहिती पाहू .... 

Aadhar card - Ration card Link
Aadhar card-Ration card-linking 

आधार -रेशन कार्ड ऑनलाईन लिंक -Aadhar -Ration card online link -

तुम्ही आधार -रेशन कार्ड लिंक 'Aadhar -Ration card linking' करू शकता. त्यासाठी आपल्या जवळ आवश्यक कागद पत्रे आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर ची  गरज राहणार आहे. चला तर आधारशी रेशन कार्ड कसे लिंक करावे पाहूया. 

१) सर्वात आधी पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम ( PDS ) च्या  अधिकृत वेब साईट वर जा. 

२) सक्रिय कार्डसह आधार लिंक  निवडा. 

३) तुमचा रेशन कार्ड क्रमांक आणि त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाका. 

४) तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. 

५) सुरु ठेवा / सबमिट करा पर्याय निवड. 

६) आता तुम्हाला मोबाइल  वर एक OTP येईल. 

७) आधार -रेशन लिंक पेजवर OTP टाका आणि सबमिट करा. 

८) आता प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्याची माहिती देणारा SMS प्राप्त होईल. 

आधार - रेशन कार्ड ऑफलाईन लिंक-Aadhar -Ration card offline link 

१) सर्वात आधी तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक वितरण प्रणाली ( PDS) केंद्र किंवा रेशन दुकानात जावे. 

२) तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्ड ची  फोटोकॉपी, कुटुंब प्रमुखाचा एक पासपोर्ट फोटो  आणि रेशन कार्ड सोबत ठेवा. 

३) तुमचे बँक खाते तुमच्या आधारशी लिंक केलेले नसेल तर पासबुकाची फोटोकॉपी जमा करावी. 

५)  रेशन दुकानावर सर्व  कागदपत्रे तुमच्या आधार कार्ड  फोटोकॉपी सह जमा करा. 

६) अधिकारी तुमचे बायोमेट्रिक  जसे कि -तुमच्या बोटांचे ठसे कॅप्चर करतील.आणि आधार प्रमाणीकरणसाठी सत्यापित करतील.   

७) वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि तुमचे सर्व कागदपत्रे सबमिट झाल्यावर तुमच्या आधार कार्ड शी लिंक मोबाईलवर SMS पाठवाला  जाईल. 

८) रेशन - आधार कार्ड लिंक झाल्यावर तुम्हाला पुष्ठीचा SMS मिळेल. 

आवश्यक कागदपत्रे -

१) मुळ रेशन कार्ड फोटोकॉपी 

२) कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डची फोटोकॉपी 

३) कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डची फोटोकॉपी 

४) बँकेच्या पासबुक फोटोकॉपी

५) कुटुंब प्रमुखाचे दोन पासपोर्ट साईज फोटो. इत्यादी 

Post a Comment

0 Comments