शास्त्रीय पद्धतीने करा बीजप्रक्रिया - किड व रोगांच्या नियंत्रणासाठी बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी टाळा.
Beej prakriya :- शेती व्यवसायामध्ये चांगल्या प्रतीचे बी बियाण्यास बरेच महत्त्व आहे. बियाणे हा शेती मधला एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उत्तम उगवण शक्ती असलेले चांगल्या प्रतीचे सुधारित व कीड रोगांपासून मुक्त असलेल्या बियाणांची बाजारात मागणी असते.
![]() |
| Beej prakriya |
उत्पादनात बीज प्रक्रियेचे महत्त्व :-
पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजीवांचा प्रसार बियांद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न विसरता बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यामुळे उद्या पिकांवरील कीड व रोगांचे नियंत्रण होते तर बीज प्रक्रियेमुळे बियांवरील सुप्ता अवस्थेत असलेल्या रोगांचे तसेच इतर जिवाणूचे नियंत्रण सुरवातीलाच होते. उभ्या पिकात दिसणाऱ्या बऱ्याच रोगांचे मूळ बियांमध्ये असते. एकदा असे रोबोट बी उगवून आले की त्यातील रोगांचे नियंत्रण करणे अवघड होते.
बीज प्रक्रिया म्हणजे काय? What is the seeds processing?
बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी बियाण्यातून हलके, किडलेले, रोगमुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून निरोगी बियाण्याचे रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता वाढवण्यासाठी व रोपे सशक्त आणि जोमदार वाढवण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळ्या जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते त्याला बीज प्रक्रिया असे म्हणतात.
बीज प्रक्रिया चे फायदे / benefits of seed processing :-
- जमिनीतून किंवा बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते.
- बियाण्याचे उगवण क्षमता वाढते.
- पिकाची वाढ चांगली आणि जोमदार होते.
- बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो.
- कीड व रोगाचे नियंत्रण ठेवायचे पद्धतीने करता येते.
- पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते.
- पिक संरक्षणाचा खर्च कमी होतो.
- बीज प्रक्रियेमुळे नत्र, स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खतावरील खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते.
- जिवाणू संवर्धन प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी.
- जीवाणू संवर्धन लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके बुरशीनाशके जंतुनाशके इत्यादी लावलेले असतील तर जिवाणू संवर्धन नेहमीपेक्षा दीड पट जास्त प्रमाणात लावावे.
- रायझोबियन जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया पाकीट वर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गटसमूहाने करावी.
- जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा रायझोबियम, अझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जिवाणू खत या जिवाणू संवर्धनाची बीच प्रक्रिया करता येते.
- प्रक्रिया केलेले बियाणे थंड कोरड्या जागेत सावलीत सुकवून पेरावे.
- बीज प्रक्रियेसाठी ड्रम वापरावा किंवा कोणत्याही मडक्यात योग्य प्रमाणात बियाणे व औषध टाकून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे व मडके उभे आडवे तिरपे असे काही वेळ हलवावे म्हणजे सर्व बियाणे सारख्या प्रमाणात औषध लागेल.
- रासायनिक बुरशीनाशकाची पेज प्रक्रिया करताना हातात रबरी किंवा प्लास्टिकचे हात मोजे वापरावे.
- डोळ्यांना चष्मा व नाकाला रुमाल बांधावा.
जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया :-
- एक लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकडून तयार करावे.
- द्रावण थंड झाल्यावर त्या द्रावणात 250 ग्राम जिवाणू संवर्धक टाकून मिसळावे.
- 10 ते 15 किलो बियाण्यास स्वच्छ जागेवर प्लास्टिक किंवा ताडपत्री वर पसरून त्यावर तयार केलेले संवर्धनाचे मिश्रण शिंपडावे.
- बियाण्यास हळुवार चोळावे आणि जिवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर सारख्या प्रमाणात बसेल व बियाण्यांचा वरील भाग खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.
- बियाण्यास प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा मात्र उपलब्ध करून देणारे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, स्फुरद विरघळणारे जिवाणू खत यांचे मिश्रण करून लावावे
- प्रक्रिया केलेले बियाणे सावित्री वाळवावे व 24 तासाच्या आत पेरावे.
- रोगाचा प्रसार हा मुख्यता बियाण्याद्वारे होत असल्यामुळे पेरणीपूर्वी गरम पाण्याची बीज प्रक्रिया 20 ते 30 मिनिट करावी.
- प्रशासनारे किड्यांचा बाजारभाव थांबवण्यासाठी इमिडायक्लोप्रिड 70 टक्के डब्ल्यू. एस. कीटकनाशकाची 5 मिली / प्रति किलो बियाण्याला बीजप्रक्रिया करावी.
- शेतामध्ये पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी 15 सें.मी * 30 सें.मी 160 पिवळे चिकट सापळे हेक्टरी लावावे.
- पांढरी माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी.
- पांढरी माशी ची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आल्यास मोनोक्रोटोफॉस 36 टक्के 20 मिली किंवा थायोमिथॉक्झम 25 डब्ल्यू. जी. 12-15 ग्राम यापैकी कोणतेही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.