मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2023

    नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 'Solar Pump Yojana' ची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट अनुदान किती मिळणार अर्ज कुठे करायचा त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती तसेच अटी पात्रता लाभार्थ्यांचे निवडीचे निकष कोणते या सर्व बाबींविषयी माहिती आपण या लेखात पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात एक लाख पंप बसवण्याचे लक्ष आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.


Mukhyamantri-Saur-Krushi-Pump-Yojana-2023
Solar Pump Yojana

मुख्यमंत्री सौर कृषी पंपाचे फायदे / Solar Pump Benefits -

दिवसा शेती पंपाला विजेची उपलब्धता

दिवसा विनाव्यतय अखंडित वीजपुरवठा

वीज बिलापासून मुक्तता

डिझेल आणि विद्युत पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च

पर्यावरण पूरक परिचलन

शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडी पासून पृथ्थकरण करणे.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ( 3 व 5 एचपी ) :-

शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत असलेली शेत जमीन असणे.

पारंपारिक पद्धतीने कृषी पंपाकरिता विद्युत जोडणी न झालेले शेतकरी.

5 एकरापर्यंत शेतजमीन धारकास 3 HP (अश्वशक्ती) सौर कृषी पंप व 5 एकारापेक्षा जास्त शेत जमीन धारकास 5 HP (अश्वशक्ती) व 7.5 HP सौर कृषी पंप देण्यात येतील.

यापूर्वी शासनाच्या कुठल्या योजनेद्वारे कृषी पंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.

अती दुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.

वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युत करून न झालेल्या गावातील शेतकरी.

धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.

महावितरण कडे विद्युत जोडणी साठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ( 7.5 HP  ) :-

विहीर किंवा कुपनलिका यापैकी जलस्रोत असणे आवश्यक आहे.

अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार च्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपाशाची स्थिती (stage of extraction) 60 % पेक्षा कमी आहे अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कोपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.

खडकाच्या क्षेत्रात खोदलेल्या विंधन विहिरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहिरींमध्ये (Borewell), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. मात्र गाळाच्या क्षेत्रात कोरल्या जाणाऱ्या खूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षित क्षेत्रातील खूप नलिकांमध्ये (Tubewell) नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.

कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रांमध्ये साठ मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा खूप नलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा :-

वर्गवारी     लाभार्थी हिस्सा         3HP लाभार्थी हिस्सा         5 HP लाभार्थी हिस्सा  

General         10 %                 RS. 16560/-             RS. 24710/-

SC                    5 %                 RS. 8280/-             RS. 12355/-

ST                    5 %                 RS. 8280/-             RS. 12355/-


मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :-

    या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पत्र शेतकऱ्यांनी योजनेचा अर्ज करणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे-

अर्जदाराचे आधार कार्ड

शेतीचे कागदपत्र

मूळनिवासाचे प्रमाणपत्र

बँक पासबुक

मोबाईल नंबर

सातबारा उतारा

ओळखपत्र

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया :-

    या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन https://www.mahadiscom.in/solar/index.html या वेबसाईटवर जाऊन अर्ज काढणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे-

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राज्यातील महावितरण च्या अधिकारी वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल या होमपेज वर तुम्हाला Beneficiary Services  यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर दिलेला पर्याय मधून Apply Online या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर new consumer  हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.

या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर एक नवीन अर्ज येईल.

या अर्जामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे याप्रमाणे:-

1. Paid pending AG connection consumer details -शेतकऱ्यांना जर विद्युत कनेक्शन साठी पैसे भरून त्यापैकी झाली नसेल तर त्याविषयी माहिती भरावी.

2. Details of Applicant And Location:-त्यानंतर अर्जदाराने आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती आणि जागेचा तपशील भरावा.

3. Nearest MSEDCL Consumer Number :-तुम्हाला यानंतर जास्तीत जमिनीवर पंप बसवण्याचा आहे त्या शेतीबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागेल तसेच तुम्हाला जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक द्यावा लागेल.

4. Details of Applicant Residential address and location:-यानंतर तुम्हाला तुमच्या घरचा संपूर्ण पत्ता आणि ठिकाणाबद्दल माहिती भरावी लागेल.

वरील प्रमाणे संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे.

आता यानंतर वडजामध्ये मागितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील. त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा सांग माहिती तपासून पहा.

यानंतर स्वप्नावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.

अशा प्रकारे तुमची योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अर्जाची स्थिती तपासणी :-

    तुम्ही महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची  स्थिती खालील प्रमाणे पाहू शकता.-

अधिकृत वेबसाईट वरच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला लाभार्थी सेवा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला दिलेला पर्याय मधून Track Application Status या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल आता या नवीन पेजवर तुम्हाला अर्ज ची स्थिती पाहण्यासाठी लाभार्थी आयडी टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला सर्च या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर संबंधित अर्जाची स्थिती दिसेल.