नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी चे उपयोग व फायदे जाणून घ्या.| Benefits of Nano Urea and Nano DAP

नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी चे उपयोग व फायदे | Benefits of Nano Urea and Nano DAP 

नॅनो युरिया व डीएपी खते :-

नॅनो युरिया व डीएपी हे एक आधुनिक नत्र व स्फुरदयुक्त द्रवरूप खत आहे. जे पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे मात्र व स्फुरद हे मुख्य अन्नद्रव्य पुरवतात. जगात सर्वप्रथम न्यानो एवढ्या व डीएपी विकसित करण्याचा मान  इफको कडे जातो.

benifits-of-nano-urea-and-nano-dap
IFFCO Nano Urea and Nano DAP (Liquid)

नॅनो युरिया म्हणजे काय?

नॅनो युरिया हे एक द्रवरूप नत्रयुक्त खत असून त्यामध्ये चार टक्के नत्र नॅनो कणांच्या स्वरूपात असतो. त्यामधील नॅनो नत्र कणांचा आकार हा 30 ते 50 नॅनोमीटर इतका असतो.

नॅनो युरियाची वैशिष्ट्ये :-

नॅनो युरिया मध्ये नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एक संघ असतात. तसेच त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे पारंपारिक युरिया पेक्षा दहा हजार पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता 90% पर्यंत असते. जी पारंपारिक युरिया मध्ये तीस ते पन्नास टक्के असते. इफको नॅनो युरिया मधील नत्र हे उपलब्ध स्वरूपातील असल्यामुळे ते पिकाची नत्राची गरज प्रभावीपणे भागवते.

नॅनो डीपी म्हणजे काय?

नॅनो डीएपी ( द्रवरूप ) एक नवीन खत आहे. जे FCO (1985) अंतर्गत 2 मार्च 2023 रोजी भारत सरकारने अधिसूचित केले आहे. त्यात नत्र 8 % आणि स्फुरद 16 % आहे.

  • नॅनो डीपी मध्ये कणांचा आकार 100 नॅनोमीटर पेक्षा कमी आहे. या अद्वितीय गुणधर्मामुळे बियाणे / मुळांच्या आत किंवा पानांवर उपलब्ध रंध्र छिद्रातून आणि वनस्पतीच्या इतर छिद्रातून सहजपणे प्रवेश करू शकतात.
  • नॅनो डीएपी ( द्रवरूप ) पानांवर व बियाणांवर / मुलांवर व्यवस्थितपणे पसरतो आणि झाडांद्वारे सहजपणे उपयोगात आणल्या जातो. परिणाम स्वरूप बियाण्यांची जोम शक्ती वाढते. हरिद्रव्य जास्त बनते, प्रकाश संश्लेषण अधिक होते, पिकाचे गुणवत्ता व पीक उत्पादनात वाढ होते.

नॅनो युरिया व नॅनो डीएपी चे फायदे :-

  • नॅनो युरिया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते. खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते. पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते.
  • नॅनो युरियाची एक बाटली (500 ml ) आणि एक युरियाची गोणी (45 kg) यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपारिक युरिया खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबन कमी होते. पारंपारिक युरियाच्या तुलनेत नॅनो युरिया या कमी लागतो.
  • नॅनो डीएपी ची एक बाटली (500ml) आणि एक डीएपी गोणी (50kg) यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपारिक डीएपी खतांवरील शेतकऱ्यांचे अवलंबन कमी झाले.
  • पारंपारिक डीएपीच्या तुलनेत नॅनो डीएपी कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची साठवणूक व वाहतूक यावरचा खर्च कमी होतो. देशहिताच्या दृष्टिकोनातून युरिया व डीएपी साठी द्यावे लागणारे अनुदान व वाहतूक यावरील खर्च कमी होतो.
  • नॅनो युरिया / नॅनो डीएपीच्या वापरामुळे हवा पाणी आणि जमीन यांची हानी थांबते. ग्लोबल वार्मिंग साठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते.
  • नॅनो युरिया / नॅनो डीएपी सोबत जैविक उत्तेजक, द्रवरूप खते आणि कीटकनाशके, तन नाशके यांची फवारणी घेता येते. फक्त एकत्र मिसळण्यापूर्वी सुसगंता  चाचणी करावी.
  • नॅनो युरिया / नॅनो डीएपी हा सर्व पिकांसाठी उपलब्ध नत्र आणि स्फुरद चा उत्तम स्त्रोत आहे. याच्या वापरामुळे उद्या पिकातील नत्रा आणि कमतरता दूर होते.
  • अनुकूल परिस्थितीमध्ये कार्यक्षमता 90 टक्के पेक्षा जास्त असते.
  • नॅनो युरिया व नॅनो डीएपी स्वदेशी आणि विनाअनुदानित खत आहे.
  • नॅनो युरिया / नॅनो डीएपी हे पारंपारिक युरिया व डीएपी  पेक्षा स्वस्त आहे.
  • याच्या वापरामुळे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे माती हवा आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते.
  • जैविक सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल, विषमुक्त, शाश्वत शेतीसाठी योग्य आहे.
  • नॅनो डीएपी उपयोग सीड प्रायमर म्हणून लवकर अंकुरण आणि जोमाने वाढ.
  •  पिकाची वाढ आणि गुणवत्ता वाढवण्यात सहाय्यक ठरते.
  • वाहतूक व साठवणुकीसाठी सोपे व किफायतशीर ठरते.
  • कृषी उत्पादना व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ.

नॅनो युरिया / नॅनो डीएपी खते वापरण्याच्या सूचना :-

  1. सूक्ष्म कणांसाठी व पाणी पूर्ण ओले होण्यासाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल असलेल्या फवारणी पंपांचा वापर करावा.
  2. फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी, जेव्हा पानांवर ओस नसेल.
  3. जर इफको नॅनो युरिया / नॅनो डीएपी चे फवारणी केल्यानंतर दोन तासाच्या आत पाऊस पडला तर फवारणी पून्हा करावी.
  4. नॅनो युरिया / नॅनो डीएपी द्रावण तयार करण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
  5. नॅनो युरिया / नॅनो डीएपी विषारी नाही, परंतु फवारणीच्या वेळी मास्क व हात मोजे वापरावे.
  6. नॅनो युरिया / नॅनो डीएपी ची कोरड्या ठिकाणी साठवून करावी व लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यापासून दूर ठेवावे.
  7. नॅनो युरिया / नॅनो डीएपी खताची बाटली वापरण्यामुळे चांगली हलवावी. नॅनो डीएपी सगळ्या जैव उत्तेजक, इतर नॅनो खते जसे की नॅनो युरिया, 100% पाण्यात विरघळणारे खत आणि इतर शेतकी रसायनांमध्ये सहज मिसळता येते, परंतु फवारणी पूर्वी जार चाचणी करून घ्यावी.
  8. स्फुरद युक्त खतांचा (डीएपी व एस. एस. पी.) व युरियाच्या टॉप ड्रेस डोस नॅनो युरिया / नॅनो डीएपीच्या वापर आणि 50 टक्के पर्यंत कमी केला जाऊ शकतो.
  9. जास्त कालावधीच्या पिकामध्ये चांगला परिणाम मिळवण्यासाठी नॅनो युरिया / नॅनो डीएपी ची तिसरी फवारणी करावी.
  10. शिफारशी प्रमाणे वेगवेगळ्या पंपांसाठी उदा. नैपसक पंप, पावर पंप, ड्रोन पंप यासाठी नॅनो खते वापरावी.
  11. नॅनो डीएपी हे जैव सुरक्षित आहे व त्यातील सर्व घटक GRAS (सामान्यतः सुरक्षित म्हणून ओळखले जाते) जागतिक मानांकनुसार आहेत.

बीज प्रक्रियेसाठी नॅनो डीएपी वापरण्याच्या सूचना :-

  1. नॅनो डीएपी ची प्रक्रिया करत असताना हात मोजे अथवा प्लास्टिक बॅगचा उपयोग करावा.
  2. बीज प्रक्रिया करत असताना सर्वात आधी बुरशीनाशके, कीटकनाशके त्यांची प्रक्रिया करावी आणि त्यानंतर जैविक खतांमध्ये नॅनो डीएपी मिसळून प्रक्रिया करावी.
  3. काही कारणास्तव नॅनो डीएपीची बीज प्रक्रिया चुकलास तेवढी मात्र पहिल्या फवारणीमध्ये वाढवावी.
  4. लहान आकारांच्या बियाणांमध्ये शक्यतो रोप मुळे प्रक्रिया करावी.
  5. नॅनो डीएपी चे द्रावण बीज प्रक्रियेनंतर शिल्लक राहिल्यास मातीमध्ये ओतून द्यावे.

Post a Comment

0 Comments