प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 : असा ऑनलाईन करा अर्ज | PM Pik Vima Yojana in Marathi |
Pm Pik Vima Yojana :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेला खरीप हंगाम 2023-24 ते रब्बी हंगाम 2025-26 या तीन वर्षाकरिता मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी सर्व जिल्ह्यांकरिता विमा कंपन्यांची निवड केलेली आहे. खरीप हंगामा त बाजरी मका सोयाबीन कापूस, मुंग या प्रकारच्या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झालेले आहे.
![]() |
PM Pik Vima Yojana In Maharashtra |
पिक विमा अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांनी आपली पेरणी केल्या नंतर पिकांना विमा संरक्षण मिळवण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सहभागी व्हावे पिक विमा भरण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा आपल्या बँक शाखेत जाऊन अर्ज करावा. शेतकरी महा-ई-सेवा केंद्र सामुदायिक सुविधा केंद्र राष्ट्रीयकृत बँक येथे जाऊन पिक विमा काढू शकतात.
पिक विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, 8अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
पिक विमा संरक्षण मध्ये कोणत्या पिकांचा समावेश :-
सर्व प्रमुख धान्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2023-24 करिता पिकनिहाय भरावयाचा विमा हप्ता व संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी खालील प्रमाणे -
- मका - विमा संरक्षित रक्कम ₹ 35,598/-
- बाजरी - विमा संरक्षित रक्कम ₹ 30,000/-
- मूंग - विमा संरक्षित रक्कम ₹ 20,000/-
- उडीद - विमा संरक्षित रक्कम ₹ 20,000/-
- सोयाबीन - विमा संरक्षित रक्कम ₹ 49,500/-
- भुईमूग - विमा संरक्षित रक्कम ₹ 42,971/-
- खरीप कांदा विमा संरक्षित रक्कम ₹ 81,422/-
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा हप्ता किती?
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ ₹ 1/-विमा हप्ता भरायचा आहे या योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना हे चेक करण्यात आली असून कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत किंवा पतपुरवठा करणारे संस्थेत कळविणे बंधनकारक आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज करण्याची मुदत :-
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत मुदत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे चालू खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या आहे.
पीक नुकसान भरपाई ची प्रक्रिया :-
जर पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पिक विमा कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री क्रमांक माहिती द्यावी लागणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनी पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे आवश्यक असणार आहे. पिक विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यामध्ये कोणते प्रकारची तफावत असल्यास ई-पिक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या कंपन्या द्वारे विमा सुविधा देणार :-
सरकारने हे योजना लागू करण्यासाठी विमा कंपन्यांकडून अर्ज मागविले होते त्यात राज्य सरकारने नो कंपन्यांची निवड करून योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक कंपनीस जिल्ह्यांची नेमणूक करून दिलेली आहे ते पुढील प्रमाणे -
- ओरिएंटल इन्शुरन्स - अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा.
- आयसीआयसीआय लोम्बार्ड - परभणी, वर्धा, नागपूर.
- युनिव्हर्सल सोम्पो - जालना, गोंदिया, कोल्हापूर.
- युनायटेड इंडिया - नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
- चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स - छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड.
- भारतीय कृषी विमा कंपनी - बुलढाणा, वाशिम, सांगली, बीड, नंदुरबार.
- एचडीएफसी अर्गो - हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशिव.
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स - यवतमाळ, अमरावती, गडचिरोली.
- एसबीआय जनरल इन्शुरन्स - लातूर.
0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.