How To Apply for Domicile Certificate Online in Maharashtra / डोमेसाइल सर्टिफिकेटला अर्ज कसा करावा -
शाळा आणि महाविद्यालयात विविध कामांसाठी डोमेसाइल सर्टिफिकेट मागितले जाते. अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये स्कॉलरशिप फॉर्म अथवा अन्य कोणताही फॉर्म भारतात तेव्हा हे सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक कमासोबतच आपल्याला शासकीय परीक्षांचे फॉर्म भरताना देखील डोमेसाइल सर्टिफिकेट मागितले जाते. म्हणून डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय? ते कसे मिळते? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. त्यामुळे आज या लेखातून सर्व प्रश्नांची उत्तरे पाहू. ( How many days required to get domicile certificate in Maharashtra? )
डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे काय? / What is Domicile Certificate?
वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट होय. तुम्ही ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात राहत आहात त्याचा यामध्ये पुरावा असतो. हा दाखला मिळवण्यासाठी तुम्ही 15 वाषणपसून येथील रहिवासी असणे गरजेचे आहे. किंवा तुमचे आई वडील गेल्या 9 वर्षांपासून त्या राज्यात राहत असेल पाहिजेत. तरच तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट मिळेल. डोमेसाइल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते. त्यामुळे होणारी गर्दी आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता शासनाने हा दाखला ऑनलाईन देखील उपलब्ध केला आहे. (How can I get Maharashtra domicile certificate?)
![]() |
| How To Apply for Domicile Certificate |
महाराष्ट्रातील डोमेसाइल सर्टिफिकेट ऑनलाईन कसे काढायचे / How to Get Maharashtra Domicile Certificate Online -
१. ऑनलाईन पद्धतीने हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकला भेट द्या.
२. लिंकवर आल्यानंतर आधी तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या.
३. यावेळी तुम्हाला व्हेरिफाय मोबाईल युजिंग ओटीपी किंवा अपलोड कम्प्लीट प्रोफाइल युजिंग ओटीपी हे दोन पर्याय तुमच्या समोर दिसतील. यातील कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा.
४. स्क्रीनवर विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर रजिस्टर या बटणावर क्लिक करा.
५. त्यानंतर पुन्हा एकदा आपले सरकारच्या दिलेल्या वेबसाईटवर जा.
६. तिथे तुम्ही त्यात केलेले युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
७. पुढे डाव्या बाजूला रेव्हेन्यू डिपार्टमेंट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
८. त्यानंतर ड्रॉप डाऊन असा पर्याय दिसेल. तेथून रेव्हेन्यू सर्व्हिस हा ऑप्शन्स क्लिक करा.
९. यानंतर तुमची काही माहिती समोर विचारली जाईल. ती व्यवस्थित भरून सबमिट या बटणावर क्लिक करा. यावर तुम्हाला एक नंबर मिळेल. त्या क्रमांकाचा वापर तुम्ही तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेटची सद्याची स्थिती समजून घेऊ शकता.
डोमेसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक -
पत्त्याचा पुरावा / ऍड्रेस प्रुफ -
सर्वात आधी तुम्हाला ज्या ठिकाणचे डोमेसाइल सर्टिफिकेट काढायचे आहे तेथील पत्त्याचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. यासाठी लाइट बिल, पासपोर्ट, पाणीपट्टी पावती, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, 7/12 आणि 8 अ चा उतारा ड्रायविंग लायसन्स, मालमत्ता कर पावती या पैकी काही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. (How can I do Maharashtra domicile online?)
तुमच्या ओळखीचा पुरावा -
आपली स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी तुमच्याकडे ओळखीचा पुरावा असणे आवश्यक आहे. यामध्ये अर्जदाराचा फोटो, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, या पैकी काही कागदपत्रे तुमच्याकडे असायला हवी.
वयाचा पुरावा -
डोमेसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी तुमचे वय किती आहे या बब्बत एक पुरावा दिला जातो. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, वडिलांचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा अशा काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
रहिवासी पुरावा -
आता हाच कच्चा पुरावा सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कलेक्टर ऑफिस यांच्यामार्फत जारी केला जातो.( What is mean by domicile certificate in marathi? )

0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.