महाराष्ट्र शासनाची सलोखा योजना - Salokha Scheme of Maharashtra Govt -
महाराष्ट्र शासनाने शेत जमीन आणि वहिवाट वाद आप-आपसांत संपवण्यासाठी सलोखा योजना आणली आहे.
![]() |
| Salokha-Scheme-of-Maharashtra-Govt- |
सलोखा योजना - Salokha Scheme 2023
शेत जमिनीचा ताबा व वाहीवाटीबाबत शेतकऱ्यांच्या आप-आपसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाम मात्र रुपये 1000 व नोंदणी फी रुपये 1000 आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यात महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक मुद्रांक-2022/प्र. क्र. 93/म -1(धोरण) दिनांक 3 जानेवारी 2023 अन्वये मान्यता दिलेली आहे.
सदर योजना अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षापर्यंत लागू राहील. योजनेचा लाभ घेण्याकरिता दोन्ही शेतकऱ्यांचा एकमेकांच्या जमिनीवरील ताबा किमान बारा वर्षापासून असणे आवश्यक राहील. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी करून, दोस्ता नोंदणीच्या वेळी सदर पंचनामा दस्तास जोडणी बंधनकारक राहील. जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रफळात कितीही फरक असला तरी योजनेत पात्र दोन्ही पक्षकार सर्व संमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत असल्याची अट दस्तान मध्ये समाविष्ट करावी लागेल. सदर योजना अकृषक रहिवासी व वाणिज्य वापराच्या जमिनीस लागू राहणार नाही.
सदर योजनेमुळे आपापसातील पिढी जात वैरभावना संपुष्टात येऊन ताबा व मालकी याबाबतचा संभ्रम नष्ट झाल्यामुळे सकारात्मक मानसिकता निर्माण होऊन जमिनीच्या विकासाला चालना मिळेल. तसेच शेतकऱ्याचे वैयक्तिक व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन विविध न्यायालयामध्ये प्रलंबित दावे निकाली निघतील पर्यायाने शेतकरी, न्यायालय व प्रशासन यांचा वेळ व खर्च वाचेल.
सलोखा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेऊन आप-आपसातील वाद मिटवून सामाजिक सौख्य व संवाद वाढविण्यास हातभार लागेल.
सलोखा योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा?
सलोखा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित वाद मिटवण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील तलाठी कार्यालयाला भेट द्यावी लागेल आणि अर्ज सादर करावा लागेल.
सलोखा योजना अंमलबजावणी प्रक्रिया- Salokha Scheme Implementation Process-
१) तलाठी व मंडळाधिकारी यांनी गावातील पंचायत सह चौकशी करून किंवा चतुर सीमा धारकांची चर्चा करून किंवा तलाठी चावडीमध्ये चर्चा करून किंवा दलाबदल करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचे किंवा चतुर सीमा धारकांच्या घरी चर्चा करून सदर ठिकाणी पहिल्या ची मालकी असलेली जमीन किमान 12 वर्षापासून दुसऱ्याच्या ताब्यात आहे किंवा कसे? व दुसऱ्याची मालकी असलेली जमीन किमान बारा वर्षांपासून पहिल्याच्या ताब्यात आहे किंवा कसे? याबाबतची नोंद वहीत नमुन्यातील पंचनामा नोंदवही मध्ये करावी. त्या आधारे तलाठी यांनी पक्षकारांना जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र द्यावी.
२) एकूण चतुर सीमा धारकांपैकी अधिकार अभिलेखात नावे असणाऱ्या कमीत कमी दोन (वेगवेगळ्या गटातील) सज्ञान व्यक्तींच्या सह्या पंचनामा नोंदवही मध्ये असाव्या. एखाद्या गटाला चतुर सीमा धारक एकच गट असेल तर त्या चातुर सीमा धारकांची सही पंचनामावर असावी.
३) काही वेळा फार मोठा गट असून त्याचे वाटप व अनेक कोटींचे झालेले असतात. परंतु फाळणी बारा/ पोट हिस्सा झालेला नसतो. अशावेळी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच पंचनामा करावा. त्यावेळी शेजारचे वहिवाटदार असलेले दोन सज्ञान खातेदारकांची पंचनामा नोंदवहीवर सही आवश्यक राहील.
४) तलाठी यांनी गाव स्तरावर तालुका योजनेसाठी नमूद पंचनामाचे एक रजिस्टर नोंदवही ठेवावी व त्या नोंदवही वरून तलाठी यांनी पक्षकारांना पंचनामाचे प्रमाणित प्रत द्यावी.


0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.