दुधाचा रंग पांढराच का ? / why is the color of milk white?

    आपण जीवनात अनेक वेळेस दुध प्यायले असणार तसेच दुधाचा चहा, कॉफी, दही, लोणी, आस्वाद घेत असतो. दुधापासून बनवलेले चीज,पनीर आवडीने खात असतो . पण तुम्हाला कधी याचा प्रश्न पडला का, दुधाचा रंग पांढराच का असतो? तसेच कोणत्याही प्राण्याच्या दुधाचा रंग पांढराच का असतो? जर तुम्हाला याचा विचार आला असेल तर आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत. तर चला जाणून घ्या या मागची करणे ....

why-is-the-color-of-milk-white?
Milk 

दुधाचा रंग पांढराच का दिसतो?

    दुधात एक प्रकारचे प्रोटिन असते ज्याला कॅसिन असे म्हणतात. या कॅसीनमुळेच दुधाचा रंग पांढरा होतो. कॅसिन दुधातील कॅल्शियम आणि फॉस्फेट स्वतःहून छोटे कण तयार करतात आणि या कणांना मिशेल म्हणतात .

     जेव्हा प्रकाश मिशेलवर पडतो तेव्हा ते रिफ्लेक्ट होऊन तुटतात आणि त्याच रिफ्लेक्शनमुळे आपल्याला दुधाचा रंग पांढरा दिसू लागतो. त्याशिवाय दुधात असलेल्या फॅटमुळे दुधाचा रंग पांढरा असतो.

गाईचे दूध थोडे हलकं पिवळसर रंगाचे का दिसते?

     जर तुम्ही कधी लक्ष दिलेल असेल तर गाईचे दूध हे म्हशीच्या तुलनेत थोडे पिवळे असते. कारण हेच आहे की, गाईचे दूध म्हशीच्या तुलनेत थोडे पातळ असते. याचे कारण म्हणजे गाईच्या दुधात कॅसिन चे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे गाईचे दूध हलके पिवळसर रंगाचे दिसते.