'मागेल त्याला शेततळे ' योजना 2023 - वैयक्तिक शेततळ्यांसाठी सरकारकडून अनुदान | Farm Pond Scheme -

'मागेल त्याला शेततळे ' योजना 2023 - वैयक्तिक शेततळ्यांसाठी सरकारकडून अनुदान (Magel Tyala Shettale) -

    Magel Tyala Shettale :- Agriculture Irrigation Scheme दुष्काळी भागात अथवा पाणी टंचाईच्या (Water Shortage) काळात शेती सिंचनासाठी (Irrigation) पाण्याची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी (Farm Pond Scheme) सरकारकडून अनुदान (Subsidy) देण्यात येते.

Farm-Pond-Scheme
Magel Tyala Shettale

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -

    Magel Tyala Shettale या योजनेसाठी लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल एसएमएसद्वारे संदेश प्राप्त होतो. त्यानुसार त्यांनी जमीनीचा ७/१२, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचा दाखला आदी कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.

अशी आहे अनुदान वितरणाची प्रक्रिया -

    ही कागदपत्रे तपासून तालुका कृषी अधिकारी संबंधित शेतकऱ्यास ऑनलाईन पूर्वसंमती देतात.पुर्वसंमती दिल्यानंतर शेततळे खोदाईबाबत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेतकऱ्याने शेततळ्याचे काम पूर्ण करुन काम पूर्णत्वाचा दाखला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो.

    त्यानंतर कृषी पर्यवेक्षक यांनी शेततळ्याची मोका तपासणी करुन अनुदान परिगणना केल्यानुसार शेतकऱ्याला जिल्हास्तरावरुन पीएफएमएस प्रणालीद्वारे अनुदान वितरीत केले जाते.

असा करा अर्ज -

    मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाचाही समावेश करण्यात आला आहे. Magel Tyala Shettale या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या www.mahadbtmahait.gov.in संकतेस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

    त्यानंतर 'सिंचन साधने व सुविधा' या शिर्षकाअंतर्गत 'वैयक्तिक शेततळे'हा पर्याय निवडून पुढील तपशील निवडणे आवश्यक आहे. योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड ही महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने केली जाते.

मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट्ये –

    महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्य यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे. तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागेल त्याला शेततळे योजना जाहीर केली. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे.

मागेल त्याला शेततळे लाभार्थी पात्रता -

  1. ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे.
  2. यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नाही. असे लाभार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
  3. लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक असणार आहे.

मागेल त्याला शेततळे लाभार्थी निवड –

    लाभार्थी शेतकरी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असल्यास किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल अश्या कुटुंबाला म्हणजेच त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादी देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येते.

    याव्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येते.

मागेल त्याला शेततळे अनुदान देय रक्कम -

    शेतकऱ्यांच्या उपरोक्त नमूद आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम आयुक्त कृषी यांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्वरीत निश्चित करावी व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित कराव्यात. तथापि अनुदानाची कमाल रक्कम रुपये पन्नास हजार इतकी राहील रुपये पन्नास हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याने स्वतः खर्च करणे आवश्यक असणार आहे.

मागेल त्याला शेततळे शेततळ्याचे आकारमान -

    या योजनेअंतर्गत खालील आकारमानापैकी एका प्रकारची शेततळे घेण्यास मुभा राहील. आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित काम खालील प्रमाणे असणार आहे.जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रित रित्या सामुदायिक शेततळे घेता येईल. या शेततळ्याचे आकारमान अनुज्ञेय आकारमानाच्या प्रमाणात राहील. तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर पाण्याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करावा व तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.

शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी -

• कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या जागीच शेततळे घेणे लाभार्थी शेतकऱ्याला बंधनकारक असणार आहे.

• कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.

• लाभार्थीने स्वतःचा राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँक मधील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकची झेरॉक्स सहित सादर करणे गरजेचे असणार आहे.

• कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.

• शेततळ्याची निगा राखण्याची तसेच वेळेप्रसांगीं दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची असणार आहे.

• पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही, यासाठी व्यवस्था स्वतः लाभार्त्याने करावी.

• लाभार्थ्याच्या सातबारा या उतारावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील.

• शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असणार आहे.

• शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे.

• नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसानभरपाई अनुज्ञेय राहणार नाही. याची नोंद लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावी.

• मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे लाभार्थीस बंधनकारक राहील.

    इनलेट व आउटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्यास कडे शेततळ्यांमध्ये पाणी उचलून टाकण्याची आवश्यकता व त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच अशा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.

Post a Comment

0 Comments