Li-Fi technology ची भारतात केली गेली यशस्वी चाचणी
Li-Fi Network : तुम्ही थ्री इडियट चित्रपट नक्कीच पाहिला असेल. त्या चित्रपटातील प्रमुख भूमिका असलेले फुंगसुक वांगडूची व्यक्तिरेखा ही सोनम वांगचूक यांच्यापासून प्रभावित होती. त्यांनी लडाख मध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी ची यशस्वी चाचणी केली आहे. त्या टेक्नॉलॉजी चे नाव लाय फाय नेटवर्क. आता तुम्ही विचार करत असाल की वायफाय ऐकले आहे. परंतु हे लाय फाय नेटवर्क म्हणजे काय आहे? ते आपण पाहणार आहोत.
![]() |
| Li-Fi Technology |
लाय फाय नेटवर्क म्हणजे काय? What is Li-Fi Technology?
लायफाय म्हणजे लाईफ फिडेलिटी टेक्नॉलॉजी आहे. लायफाय हे दोन डिवाइस मध्ये डेटा हस्तांतरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले वायरलेस ऑप्टिकल नेटवर्किंग टेक्नॉलॉजी आहे. वायफाय मध्ये डेटा हस्तांतरण साठी रेडिओ वेव्हस् चा माध्यम म्हणून वापर होतो, परंतु लाय फाय (LiFi) मध्ये लेझर लाईट म्हणजे प्रकाशाचा वापर केला जातो. एका अध्ययनाद्वारे LiFi हे WiFi पेक्षा १०० पतीच्या वेगाने डेटा हस्तांतरण करण्यासाठी सक्षम आहे.
लाय फाय टेक्नॉलॉजी कसे कार्य करते? / How Li-Fi Technology works?
ज्या पद्धतीने इतर इंटरनेट डिवाइस काम करतात. त्याचप्रमाणे वायफाय देखील काम करते. या लाईफ आय टेक्नॉलॉजी मध्ये मुख्यतः तीन कंपन्यांचा वापर केला जातो.
• लॅम्प ड्रायव्हर
• एलईडी लॅम्प
• फोटो डिटेक्टर
या तिन्ही कंपोनेंट बरोबर तुम्हाला अजून एक कनेक्शन पाहिजे ज्याला आपण इंटरनेट म्हणतो. प्रकाश विसर्जित करण्यासाठी एलईडी बल्बचा वापर केला जातो या प्रकाशाच्या लहरी सोबत डेटा पाठवला जातो. एलईडी बल्ब ने पाठवलेल्या लहरी शोधण्यासाठी फोटो डिटेक्टर असते, त्याच्या मदतीने लहरींचा शोध घेतला जातो व पाठवलेला डेटा प्राप्त केला जातो. या मार्गाने डेटा ट्रान्सफर करण्याचा म्हणजेच 100 जीबी प्रतिसेकंद इतका असतो.
डोंगराळ भागात हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्यास सोयीचे-
खरं म्हणजे डोंगराळ भागात नेटवर्क लावणे आणि विजेने त्याला चालू ठेवणे खूपच अवघड काम आहे. सोबत फायबर नेटवर्क केबल टाकावे लागत नाही. परंतु, लडाख मध्ये राहणारे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या प्रयत्नाने भारतातील पहिले LiFi लेजर 5G इंटरनेटची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सोबत भारताने लडाखमध्ये जगातील पहिले लाईफाई 5G नेटवर्क बनवून इतिहास रचला आहे.
नव वायरलेस टेक्नॉलॉजी कंपनीची घेतली मदत -
या कामात अहमदाबादची कंपनी नव वायरलेस टेक्नोलॉजीची मदत घेतली आहे. सोबत लडाखच्या SECMOL चे स्टूडेंट्सच्या या टेक्नोलॉजीला बनवण्यात मदत घेतली गेली. लाय फाय नेटवर्कवरून म्हटले जात आहे की, यात वाय फायच्या तुलनेत फास्ट इंटरनेट स्पीड मिळते. सोबत ही टेक्नोलॉजी पर्यावरणासाठी सुद्धा चांगली आहे.
इतर टेक्नॉलॉजीच्या तुलनेत किंमत खूपच कमी -
सोनम वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, लाय फाय टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. हे टॉवर बेस्ड वाय फाय नेटवर्क अनेक पटीने चांगले आहे. यात लेजर बीम द्वारे 5G डेटाला ट्रान्समिशन केले जाते. या टेक्नोलॉजी मध्ये 5G नेटवर्कला पोहोचण्यास मदत करते.

0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.