सातबारा वर पिकांची नोंद ई-पीक पाहणी या मोबाईल ॲप मधून करण्याची सोपी पद्धत|E-Peek Pahani App

सातबारा वर पिकांची नोंद ई-पीक पाहणी या मोबाईल ॲप मधून करण्याची सोपी पद्धत|E-Peek Pahani App 

     E-Peek Pahani ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात न जाता स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या सातबारा वर विविध पिकांची नोंदणी करता येते.

E-Peek-Pahani-App
E-Peek-Pahani-App 

     यावर्षी खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पिक पाणी करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ई-पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांना नवीन वर्जन अपडेट करून घ्यावी.

     तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करण्यात येते की त्यांनी खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंद पूर्ण करावी. जेणेकरून शासनाच्या पिक विमा योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.

ई-पीक पाहणी ॲप (E-Peek Pahani App login) वर नोंदणी प्रक्रिया :-

  1. सर्वात प्रथम मोबाईल मधील प्ले स्टोअर मध्ये ई-पीक पाहणी (e-peek pahani app) हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे. (जुने ॲप असल्यास ते अनइंस्टॉल करावे.)
  2. विभागाची निवड करावी - ज्या विभागातील शेतकरी असेल तो विभाग निवडा.
  3. आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
  4. आपला जिल्हा, तालुका निवडा त्यानंतर ज्या गावात ई-पीक पाहणी करायचे आहे ते गाव निवडा.
  5. खातेदार नोंदणी करण्यासाठी सर्व्हे क्रमांक / खाते क्रमांक / सातबारा मधील नावाप्रमाणे करता येईल.
  6. चार अंकी संकेतांक क्रमांक येईल तो कायमचा राहील तसेच तो पुन्हा संकेतांक विसरलात या टॅब वर पाहता येईल.

ई-पीक पाहणीव्दारे पीक नोंद घेण्याची प्रक्रिया :-

  1. सर्वप्रथम शेत जमीन चालू वर्षी गवतपड असल्यास कायम पड निवडून चालू पड निवडावे.
  2. शेत जमिनीमध्ये बांधकाम, विहिर, घर, शेततळे, मत्स्य शेतीचे तळे असल्यास कायम पड निवडावे.
  3. शेत जमिनीमध्ये पीक/फळपीक असल्यास पीक माहिती नोंदवा या टॅब वर क्लिक करा. आणि खालील माहिती क्रमाने भरावी.
  • खाते क्रमांक - निवड करा.
  • भू मापन क्रमांक/ सर्वे क्रमांक /गट क्रमांक निवडा. (ज्या गट नंबर मध्ये उभे आहात तोच गट निवडा.)
  • जमिनीचे एकूण क्षेत्र (हे. आर) - हे आपोआप उपलब्ध होईल.
  • पोट खराबा - हे आपोआप उपलब्ध होईल.
  • हंगाम - ज्या हंगामाची नोंद करायची आहे तो हंगाम निवडा.
  • पिक पाहणी साठी उपलब्ध क्षेत्र - हे आपोआप उपलब्ध होईल.
  • पिकांचा वर्ग - आपल्या पिकांच्या वर्गानुसार निवड करा.
  • पिकांचा प्रकार - पीक किंवा फळपीक यापैकी निवड करावी.
  • पिकांची नावे निवडणे - पेरलेल्या पिकाची निवड करावी.
  • पिकाची पेरणी केलेले क्षेत्र भरणे - पीक पेरणीचे क्षेत्र हे.आर मध्ये भरावे.
  • जलसिंचनाचे साधन निवडणे - आपल्याकडील शेत जमीन विहीर, शेततळे असल्यास त्याप्रमाणे निवड करणे.
  • सिंचन पद्धत - अजल सिंचन निवड केल्यास सिंचन पद्धत उपलब्ध होणार नाही.
  • लागवडी ची दिनांक - ज्या तारखेला पिकाची लागवड केली.
  • किमान आधारभूत किमतीसाठी नोंदणी करणे. - होय निवडणे.
  • रेखांश व अक्षांश घेणे - टॅब वर क्लिक करणे.
  • मुख्य पिकांचे छायाचित्र / फोटो घेणे. - पिकांचा फोटो येईल ✓ टिक मार्क किंवा ओके करावे.
  • पिक पेरा भरल्या बाबतचे स्वयंघोषणापत्र दिसेल. ✓ होय म्हणून एक मार्क करावे आणि पुढे जा बटन क्लिक करा.
  • सबमिट करा. ✓ टिक मार्क करा. त्यानंतर अपलोड झाले याबाबत मेसेज येईल. 

बांधावरील झाडांची माहिती भरणे. :-

     शेतातील बांधावर जर नारळ, आंबा, सुपारी, काजू, पेरू, आवडा इत्यादी प्रकारचे कोणतेही झाडे असल्यास खाते नंबर सर्वे नंबर टाकून झाडांची नावे, झाडांची संख्या नमूद करावी. त्यानंतर फोटो काढावा व स्वयंघोषणा पत्रावर ✓ टिक मार्क करावी. आणि माहिती सबमिट करावी.


Post a Comment

0 Comments