ई-पीक पाहणी 2023 : अशाप्रकारे करा 7/12 (सातबारा) वर पिकांची नोंद
E-Peek Pahani :- ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साह्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जात स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या सातबारा वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्र राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲप मध्ये आतापर्यंत सुमारे 1.88 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.
![]() |
E-Peek Pahani App |
खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई - पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पिक पाहणी करण्यासाठी 1 जुलै 2023 पासून सुरू करण्यात येत आहे.
तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की त्यांनी खरीप हंगाम 2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.
ई-पिक पाहणी मोबाईल ॲप व्दारे पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया :-
- शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ॲप यामध्ये जाऊन ई पीक पाहणी ॲप सर्च करून ते आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचे आहे.
- ॲप डाऊनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमचा महसूल विभागाची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायचे आणि पुढे जा.
- आता तुम्हाला तुमचे पहिले नाव /मधले नाव / आडनाव/ खाते क्रमांक / गट क्रमांक यापैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करा. त्यातून तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे.
- आता तुम्हाला तुमची खाते निवडून पुढे जायचे आहे.
- आता तुम्हाला पीक पेरणीची माहिती भरायची आहे.
- त्यानंतर तुम्हाला पिकांची निवड करायची आहे.
- आता पिकांची निवड केल्यानंतर पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
- आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहे. त्यासाठी आपल्या मोबाईलचे जीपीएस लोकेशन सुरू असणे आवश्यक आहे.
- आता तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकांचे छायाचित्र अपलोड करायचे आहे.
अशाप्रकारे तुमची ई-पीक पाहणी मोबाईल ॲप व्दारे पीक नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण होईल.
ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) ॲप चे फायदे :-
- ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे तलाठी स्तरावरील एक पाहणी नोंदविताना मागील हंगामाची पिक पाणी कायम ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
- ई - पीक पाहणी मध्ये केलेल्या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांचे उत्पादन शेत जमीन पत्वारी अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज मिळवणे शक्य होते.
- ई - पीक पाहणी नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज (crop loan) मिळविणे देखील सुलभ होणार आहे.
- पिक विमा आणि पीक विम्याचे दावे, पिक कर्ज वाटप, अचूक नुकसान भरपाई आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास योग्य मदत मिळावी यासाठी ई पीक पाहणी तपासणी नोंदी आवश्यक असतात.
- ई -पीक पाहणी ॲप मध्ये शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करताना राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून प्रत्येक पिकाचा फोटो शेतकरी घेतात त्यामुळे फोटो घेण्याच्या ठिकाणापासून ते गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर यामध्ये दिसणार आहे. व निवडलेल्या गटापासून शेतकरी पिक पाहणी साठी दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश (Masseges) त्यांच्या मोबाईल ॲप मध्ये दर्शविण्यात येतो. या प्रकारच्या नवीन सुविधे मुळे पिकाचा अचूक फोटो घेता येणार आहे.
- ई - पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव तालुका आणि जिल्हा निहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होईल. त्यामुळे राज्यातील आर्थिक नियोजन तसेच कृषी विकास नियोजन करण्यास मदत होते.
- शेतकऱ्यांचे पिक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सोपे होते.
- ई -पीक पाहणी ॲप मध्ये शेतकऱ्यांनी केलेली पिकांची नोंदणी स्वयंप प्रमाणित मानण्यात येते. तसेच केवळ 10 टक्के तपासणी तलाठ्या मार्फत करण्यात येते.
- नोंदणी करण्यासाठी स्मार्टफोन द्वारे गुगल प्ले स्टोअर वरून ई - पीक पाहणी अपडेट ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे.
- खातेदाराने ई - पीक पाहणी ॲप वर मोबाईल नंबरची नोंद करावी.
- खातेदाराने सातबारा वरील नावांमधून खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक निवड करावी.
- ज्या खातेदाराचे एकाच गावाच्या शिवारात एकापेक्षा जास्त खाते क्रमांक असतील तर त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्यामधील भूमापन/गट क्रमांक सर्व मोबाईल स्क्रीनवर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
- शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी खाते क्रमांक /भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत सातबारा किंवा 8अ यांची सत्यप्रत सोबत ठेवावी.
- सामायिक मालकीच्या जमिनीसाठी ज्यांचे नाव गाव सातबारा मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंद आहे. ते सर्व सामायिक खातेदार आपल्या वहिवाटीत असलेल्या क्षेत्रातील स्वतंत्रपणे पिकांची नोंद करू शकतात.
- अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्यांचे पालक नोंदणी करू शकतात.
- खातेदाराने पीक पाहणीची सर्व माहिती शेतामध्ये उबेर राहून भरायची असते आणि त्या पिकांची अक्षांश व रेखांश सह फोटो काढून अपलोड करावी. जर शेतामध्ये मोबाईल इंटरनेट मध्ये काही अडचण येत असल्यास ज्या ठिकाणी इंटरनेट व्यवस्थितपणे चालते तेथे जाऊन माहिती अपलोड करावी.
- नोंदणी कृत मोबाईलवर आलेल्या सांकेतांक हा कायमस्वरूपी वापरता येतो.
- एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल तर सहज उपलब्ध होणाऱ्या दुसऱ्याच्या स्मार्टफोनवरून नोंदणी करता येते.
- एका मोबाईल नंबर वरून एकूण 20 खातेदारांची नोंदणी करता येते.
0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.