दोन हजाराची नोट बंद करण्याचा आरबीआयचा निर्णय

     आताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व बँकेने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाच्या जवळपास सर्वांना परिणाम होणार असून यापुढे दोन हजार रुपयांच्या नोटांची चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि सर्वांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बदलून किंवा जमा करण्यास सांगितले आहे.

     शुक्रवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, भारतीय रिझर्व बँकेच्या "स्वच्छ नोट धोरणा"च्या माध्यमातून ₹2000 मूल्यांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ₹2000 च्या नोटा कायदेशीर निविदा राहतील. हा निर्णय कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ देण्यासाठी सर्व बँकांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ₹2000 च्या नोटांची ठेव आणि विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी.

आरबीआय बँकांना दोन हजार रुपये तात्काळ देण्यास बंदी

     आरबीआय ने या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना म्हटले की, सुमारे 89% ₹2000 मूल्याच्या नोटा मार्च 2017 पूर्वी चलनात आणल्या होत्या. त्यांना जवळपास चार ते पाच वर्ष झाले आहेत. चलनात आलेल्या या नोटांचे मूल्य 31 मार्च 2018 रोजी ₹6.73 लाख कोटीवरून 31 मार्च 2020 रोजी ₹3=62 लाख कोटींवर आले होते जे 31मार्च 2023 रोजी चलनात असलेल्या नोटांच्या केवळ 10.8% आहे. आणि असे निदर्शनास आले की, इतर मूल्यांच्या नोटांचा साठा हा लोकांच्या चलनाची गरज भागविण्यासाठी पुरेसा आहे.

     आर बी आय ने सांगितले की, लोकांना त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन इतर मुलींचे नोटांमध्ये बदलून घेऊ शकतात.बँकेने पुढे म्हटले आहे की, ऑपरेशनल सुविधा सुनिश्चित करण्यासाठी बँक शाखांच्या नियमित कामजात व्यत्यय येऊ नये म्हणून दोन हजार रुपयांच्या नोटा इतर मूल्याच्या नोटांमध्ये बदलून घेण्यासाठी कोणत्याही बँकेत एका वेळी वीस हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा 23 मे पासून सुरू केली जाईल.