पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता मिळण्यासाठी केवायसी स्थिती (Check kyc status) पहा.

Pm Kisan e-kyc status – नमस्कार शेतकरी बंधू, आपण जर पी एम किसान योजनेची केवायसी केलेली असेल तर आपली केवायसी झाली आहे का? हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या मोबाईलवर कसे चेक करायचे ते पाहणार आहोत.

अजून पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नसेल त्यांनी आजच आपल्या पी एम किसान योजनेची केवायसी करून घ्यावी त्यामुळे या योजनेचे पुढील येणारे हप्ते त्यांना मिळेल. अन्यथा योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये त्यांना मिळणार नाही.

Pm Kisan 14th installment date

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान योजनेचा चौदावा हप्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे.

केवायसी स्टेटस चेक करण्यासाठी –

बायोमेट्रिक केवायसी केलेली असेल तर खालील प्रमाणे

• सर्वात पहिले पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

• फार्मर कॉर्नर मध्ये सुरुवातीला एक केवायसी न्यू पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

• वेबसाईट ओपन केल्यानंतर आपला आधार क्रमांक टाकावा.

• सर्च पर्यायावर क्लिक करा. आपण जर बायोमेट्रिक केवायसी केलेली असेल तर म्हणजे अंगठा देऊन केवायसी केलेली असेल तर तुम्हाला पॉप-अप मध्ये E-kyc is Already done ! असा मेसेज येईल. म्हणजे आपली केवायसी झालेली आहे.

आधार कार्ड ओटीपी ने ठेवायची केली असेल तर –

• सर्वात पहिले पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

• फार्मर कॉर्नर मध्ये सुरुवातीला एक केवायसी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

• वेबसाईट ओपन केल्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक टाकावा.

• Search वरती क्लिक करा.

• नंतर आपण आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून घ्या.

• Get Mobile OTP बटनावर क्लिक करा.

• आपला मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा.

• नंतर आपल्याला e-kyc is Already done on PM -Kisan portal असा पॉप – अप मध्ये मेसेज आला तर आपली केवायसी झालेली आहे.