मोटोरोला एज 40 भारतात लॉन्च / Motorola Edge 40 launched in India : Price, features and other details
मोटोरोलाने अधिकृतपणे मोटो जी सिरीज चे दोन फोन लॉन्च केले आहे. त्यामध्ये मोटोरोला एज 40 चे भारतीय बाजारात अधिकृत अनावरण केले आहे. फोनला IP 68 रेटिंग सह जगातील सर्वात स्लिम 5G स्मार्टफोन म्हणून ओळखले जाते. एज 40 हा MediaTek Dimensty ची 8020 soc वैशिष्ट्य असणार पहिला फोन आहे तसेच वायरलेस चार्जिंग ऑफर करणारा फोन आहे. सर्वात आकर्षक भाग म्हणजे किंमत 30000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला Edge 40, 250GB अंतर्गत स्टोरेज ऑफर करतो.
![]() |
| Motorola Edge 40 |
भारतात मोटोरोला एज 40 ची किंमत
MOTOROLA Edge 40 मध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या सिंगल मॉडेल ची किंमत 29,999 रुपये आहे. हा फोन तीन रंगांमध्ये रेसिडा ग्रीन, एक्लीप्स ब्लॅक व्हेगन (लेदर फिनिशिंग) आणि लूनर ब्लू (ॲक्रिलिक ग्लास) फिनिशिंग मध्ये ऑफर केला आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडिया चैनल वर 30 मे रोजी विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच रिलायन्स डिजिटल सह भागीदार स्टोअर वर देखील उपलब्ध राहणार आहे. सध्या हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट वर प्री-ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे.
Jio वापर कर्त्यांना ₹3,100 चे फायदे देत आहे. यामध्ये ₹1000 किमतीचा 100GB अतिरिक्त 5G डाटा (10GB प्रति महिना) आणि ₹1050 किमतीच्या AJIO,Lxigo आणि ET Prime च्या भागीदार ऑफरचा समावेश आहे.
Motorola Edge 40 वैशिष्ट्ये
Motorola Edge 40 Curved display फुल एचडी रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटच्या 6.5 इंचाच्या पोलेडी पॅनल सह येतो. फोन चा डिस्प्ले HDR 10+, Amazon HDR प्लेबॅक आणि Netflix HDR प्लेबॅक साठी सपोर्ट आहे.
फोटो काढण्यासाठी मागे ड्युअल कॅमेरा सेट अप आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50 MP आणि मायक्रो विजन सह 13MP अल्ट्रा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी Motorola Edge 40 मध्ये 32MP कॅमेरा सह येतो.
Motorola Edge 40 Android 13 ऑपरेटिंग सिस्टिम वर चालतो. कंपनी दोन वर्षाच्या अँड्रॉइड अपडेट्स चे आश्वासन देत आहे.
स्मार्टफोनला 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. आणि हे 68W टर्बो फास्ट चार्जिंग सह येते. 5W रिव्हर्स चार्जिंग सह 15W फास्ट चार्जर सह येतो. फोन IP 68 रेटिंग सह येतो.

0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.