पी एम कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू

PM Kusum Solar pump महा ऊर्जा मार्फत राज्यामध्ये महा कृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजनेअंतर्गत पुढील टप्प्यासाठी सौर कृषी पंप करिता शेतकऱ्यांना महा ऊर्जा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावा. त्यासाठी ऑनलाईन पोर्टल दिनांक 17 मे 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमीन क्षेत्रानुसार व अटीनुसार तीन एचपी, पाच एचपी व साडेसात एचपी क्षमतेच्या पंपासाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावे.

     पीएम कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाऊर्जेच्या खालील दिलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन आपण आपला अर्ज सादर करू शकता.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

     पीएम कुसुम सोलर पंप योजना आज दिनांक 17 मे 2023 पासून सुरू होणार असल्याबाबत लोकमतच्या सर्व पुरवण्यांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु सध्या पीएम कुसुम सोलर पंप योजनेचे पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. काही वेळातच पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेबसाईट ला भेट देऊन पोर्टल सुरू असल्यास आपला अर्ज सादर करावा.

आजच्या ई लोकमत पेपरची जाहिरात लिंक खालील प्रमाणे :-

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_SOLK_20230517_4_1

     सोलर पंपा साठी अर्ज करताना खाली कागदपत्रांची आवश्यकता -

  1. सातबारा उतारा (विहिरीची नोंद असणे आवश्यक)
  2. 8 अ उतारा
  3. आधार कार्ड
  4. लाभार्थ्याचा पासपोर्ट फोटो
  5. बँक खाते पासबुक
  6. सामायिक विहीर असेल तर इतर खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र

    वरील प्रमाणे कागदपत्रे हे आवश्यक आहे. म्हणून अर्ज करण्या अगोदर सर्व कागदपत्रे काढून घ्यावेत. कारण आजच प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही तासातच काही जिल्ह्यांचा कोटा पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे सर्व कागदपत्रे तयार ठेवावी.

     तरी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना महा कृषी ऊर्जा अभियान आणि पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान महाऊर्जा मार्फत करण्यात आले आहे. महा ऊर्जा मार्फत जिल्हा निहाय उपलब्ध करून दिलेल्या कोठ्यानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोर्टल पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. आणि योजनेबाबतची सविस्तर माहिती व अर्ज करण्याची माहिती www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी महा उर्जेच्या संकेतस्थळावरून आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

(टीप :- शेतकऱ्यांनी इतर कुठल्याही बनावट किंवा कसल्या संख्या स्तराचा वापर करू नये याची काळजी घ्यावी.)