शेगावातील आनंदसागर आध्यात्मिक केंद्र तब्बल पाच वर्षांनी भाविकांसाठी सुरू
शेगावातील आनंदसागर आध्यात्मिक केंद्र तब्बल पाच वर्षांनी भाविकांसाठी सुरू
शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थान द्वारे संचालित आनंदसागर अध्यात्मिक केंद्र काही कारणांमुळे तब्बल पाच वर्षापासून पूर्णतः बंद केलेल्या होते. शेगावात गजानन महाराजांच्या समाधी स्थळांच्या दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची आनंदसागर बंद असल्याने नाराजी होत असे. तब्बल सुमारे साडेतीनशे एकर क्षेत्रामध्ये विस्तारित असलेला सर्वांग सुंदर आनंद सागर पूर्वीप्रमाणे प्रवेशासाठी खुला करावा अशी लाखो भाविकांची इच्छा आता पूर्ण होत आहे.
![]() |
| Anand sagar spiritual center |
आनंद सागर आध्यात्मिक केंद्राला सुरुवात -
श्री संत गजानन महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून आनंदसागर भाविकांसाठी खुला करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी दिनांक ४ मे २०२३ च्या रोजी सकाळी १० वाजता पासून आनंद सागर आध्यात्मिक केंद्राचा काही भाग भाविकांना प्रवेशासाठी खुला करण्यात आला आहे. तसेच हा प्रवेश सेवार्थ नि:शुल्क आहे. आणि प्रवेशाची वेळ दररोज सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत अशी असून सायंकाळी ५ वाजता आध्यात्मिक केंद्र बंद होईल. संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार, सेवा कार्याचा प्राधान्यक्रम ठरवून दिलेला दिलेला असून सेवाधाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे. तसेच आनंद सागर आध्यात्मिक केंद्राची देखभाल दुरुस्ती व काही भागांचे पुनःनिर्माण तसेच राहिलेले विकास कामे पूर्ण केली जाणार आहेत.
याविषयी संस्थांच्या व्यवस्थापकीय विश्वस्तांनी सूचनाफलकाद्वारे सूचित केलेले आहे. आध्यात्मिक मन:शांतीची अनुभूती देणारा, निसर्गरम्य, नयन रम्य आनंद सागराचा काही भाग आज गुरुवारपासून भाविकांसाठी उपलब्ध होणे ही शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे शेगाव नगरीत भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळणार आहे.

0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.