आधार कार्ड - पॅन कार्ड कसे लिंक करावे. How to Link Aadhar Card - Pan Card -
' Aadhar card - pan card linking 'आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे सरकारने बंधनकारक केलेले आहे. जर तुमचे पॅनकार्ड आधारशी लिंक नसेल, तर लिंक करण्यासाठी सरकारने यापूर्वी ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत दिली होती. मात्र आता मुदतीमध्ये तीन महिने वाढ करण्यात आली आहे. आधारशी पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आता ३० जून २०२३ चा कालावधी देण्यात आला आहे. जर ३० जून २०२३ पर्यंत आपल्या आधारशी पॅनकार्ड लिंक केले नाही, ते १००० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच अवैध पॅन कार्डचा उपयोग केला तर तुम्हाला १०,००० रुपया पर्यंत दंड भरावा लागू शकतो.असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.
![]() |
| How to link Aadhar card - pan card |
पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक स्टेटस तपासा - Check Pan Card and Aadhar Card Link Status -
१) आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal किंवा https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status या वेब साईट वर जा.
२) ओपन झालेल्या पेजवरील क़्विक लिंक मध्ये असलेल्या आधार लिंक स्टेट्स या वर क्लिक करा.
३) पॅन कार्ड- आधार कार्ड क्रमांक टाका. आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
४)पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असेल तर "Aadhar is already linked to pan'' असे अलर्ट संदेश दिसेल. म्हणजे तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक आहे.
५) जर "Aadhar is not linked to pan'' असा अलर्ट आला तर आपल्याला १००० रुपये दंड भरून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करावे लागेल असे न केल्यास आपले पॅन कार्ड अवैध केले जाईल.
६) जर तुम्ही अवैध पॅन कार्डचा उपयोग केला तर १०,००० रु .दंड भरावा लागू शकतो.
आधार कार्ड - पॅन कार्ड कसे लिंक करावे- How to Link Aadhar Card - Pan Card -
१)आयकर विभागाच्या https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या वेब साईट वर जा.
२) ओपन झालेल्या पेजवरील क़्विक लिंक मध्ये असलेल्या आधार लिंक या वर क्लिक करा.
३) पॅन कार्ड- आधार कार्ड क्रमांक टाका. आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
४) आधार कार्ड -पॅन कार्डचे विलंब शुल्क कसे भरावे. -
- तुमचा पॅन, ओटीपी प्राप्त करण्यासाठी पॅन आणि मोबाइल नंबरची पुष्टी करा.
- OTP पडताळणी केल्यानंतर ,तुम्हाला वेगवेगळ्या पेमेंट टाईल्स दाखवणाऱ्या पेजवर redirected केले जाईल.
- इनकॅम टॅक्स टाईलवर पुढे जा. यावर क्लिक करा.
- २०२३-२०२४ असे मुल्यांकन वर्ष आणि इतर पावत्या (500) म्हणून पेमेंट प्रकार निवडा आणि सुरू ठेवा.
- टॅक्स ब्रेकअपमध्ये 'इतर' फील्ड अंतर्गत रु 1000 म्हणून रक्कम प्रविष्ट करा आणि पुढील चरणांसह पुढे जा.
५ ) आता तुमची आधार - पॅन कार्ड लिंक विनंती यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
![]() |
| Aadhar-Pan-card-linking-status |


0 Comments
या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेले सर्व लेख सामान्य अध्ययनासाठी आहेत. तरी सर्व लेख अचूक लिहण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही माहितीचा वापर करण्यापूर्वी तपासून किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा.